Ad will apear here
Next
शंखातून उमटलेला ध्वनी
‘शंखातून उमटलेला ध्वनी’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी व्यक्तीमधील दोन अस्तित्वांवर आधारलेली आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
.........
एकाच शरीरातली दोन अस्तित्वं, एक त्या घरातल्या माणसांवर जिवापाड प्रेम करणारं, तर दुसरं त्यांचा आत्यंतिक द्वेष करणारं. ‘असं होऊ शकतं का,’ हा प्रश्न वादाचा विषय होऊ शकतो; पण असं एकदा घडलं आणि कुसाआत्याचं व्यक्तिमत्व साकारलं. दोन अस्तित्वांच्या कुसाआत्याचा संघर्ष अनुभवणाऱ्या मृदुलच्या निवेदनातून कुसाआत्याची विलक्षण कथा उलगडत जाते ती ‘शंखातून उमटलेला ध्वनी’ या कादंबरीतून...

‘शंखातून उमटलेला ध्वनी’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली एक काल्पनिक लघुकादंबरी आहे. एका व्यक्तीच्या दोन अस्तित्वांच्या विषयावर ती आधारलेली आहे, एक सामान्य अस्तित्व आणि दुसरे असामान्य अस्तित्व, या दोन्हींची सांगड या लघुकादंबरीत आहे. 

‘तसं पाहता प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन अस्तित्वं असतातच. अशा अस्तित्वांना धरूनच ही कादंबरी लिहिली आहे,’ अशी भूमिका लेखिकेनं प्रस्तावनेत मांडली आहे. ‘ही कादंबरी वाचून वाचकांनीदेखील आपल्यामध्ये असलेल्या दुसऱ्या एखाद्या अस्तित्वाचा शोध घ्यावा. कदाचित तुम्हालादेखील तुमच्यामध्ये दडलेल्या एखाद्या अस्तित्वाचा शोध लागेल,’ असं आवाहनही लेखिकेनं केलं आहे. 

वळचणीच्या सावल्या, जाधवाचा वाडा, तांबड्या आजीचे सारवलेले अंगण, सोनसळी, काळोखातील सावली, सातमाईंचे रान या कादंबऱ्यादेखील आयडा बॅरेटो यांनी लिहिल्या आहेत. 

(‘शंखातून उमटलेला ध्वनी’ या कादंबरीचे ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


(आयडा बॅरेटो यांच्या अन्य कादंबऱ्या खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZYGCI
Similar Posts
काळोखातील सावली ‘काळोखातील सावली’ ही आयडा बॅरेटो यांची लघुकादंबरी जागृत आदिशक्तीबद्दलची आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने ई-बुक स्वरूपात ती प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अल्प परिचय...
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
‘रीडिंग वॉल’वर मोफत आस्वाद घ्या अमूल्य साहित्याचा! पुणे : एका अभूतपूर्व संकटामुळे निर्माण झालेल्या संक्रमणकाळाचा अनुभव सध्या सारे जग घेत आहे. या कठीण काळातून तरण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करतो आहे. जगण्याची ही धडपड सुकर करण्याचे, तिला दिशा दाखवण्याचे काम करतात चांगले विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. पुस्तके हा या दोन्हींचा मुख्य स्रोत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language